ट्रेलर अंगावरून गेल्याने कामगाराचा मृत्यू
By Admin | Updated: June 8, 2016 02:15 IST2016-06-08T02:15:51+5:302016-06-08T02:15:51+5:30
ट्रेलरचे मागील चाक अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.

ट्रेलर अंगावरून गेल्याने कामगाराचा मृत्यू
म्हसळा : शहरातील भारत पेट्रोलियम पंपाच्या आवारात झोपलेल्या एका कामगाराच्या अंगावरून दिघी पोर्टमधून लोखंडी कॉईल वाहतूक करणाऱ्या ट्रेलरचे मागील चाक अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. मनीष सैनी (२६, रा. उत्तरप्रदेश) असे अपघातात ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे. अपघात घडल्यानंतर वाहनचालक फरार झाला आहे. या अपघाताची म्हसळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
म्हसळा शहरातील भारत पेट्रोल पंपाच्या आवारातील पत्र्याच्या शेडच्या कामासाठी आलेला कामगार बुधवारी रात्री पंपाच्या कार्यालयाशेजारील उघड्या जागेत झोपला होता. पंपाच्या आवारात दिघी पोर्टमधून लोखंडी कॉईल घेऊन आलेले अनेक ट्रेलर चालक गाडी उभी करून झोपतात. गुरुवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास वाहन चालक मोहम्मद मन्सूर अलम झुबेर हा आपल्या ताब्यातील ट्रेलर एमएच ४६ एएस ८५४९ माणगांवकडे जाण्यासाठी मागे घेत असताना पंपाच्या आवारात झोपलेल्या कामगाराच्या अंगावर ट्रेलरचे मागील चाक गेले. या अपघात कामगार मनीष सैनी जागीच ठार झाला.
अपघातानंतर वाहन चालक मोहम्मद मन्सूर अलम झुबेर फरार झाला.या घटनेची म्हसळा पोलीस ठाण्यात नोंद असून वाहन चालक झुबेरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ए.पी.आय. सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास हे. कॉ. खंदारे करीत आहेत. (वार्ताहर)