रुग्णालयात प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: August 25, 2016 02:34 IST2016-08-25T02:34:21+5:302016-08-25T02:34:21+5:30

प्रसूतीसाठी वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेच्या मृत्यूची घटना बुधवारी सकाळी घडली.

The death of the woman after delivery at the hospital | रुग्णालयात प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू

रुग्णालयात प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू


नवी मुंबई : प्रसूतीसाठी वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेच्या मृत्यूची घटना बुधवारी सकाळी घडली. प्रसूतीनंतर रक्तस्त्राव होवू लागल्यामुळे प्रकृती खालावल्याने सदर महिलेला तत्काळ जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु त्याठिकाणी दाखल करून न घेतल्यामुळे परत तिला वाशीतील पालिका रुग्णालयात आणले असता काही तासात तिचा मृत्यू झाला.
सुमन दळवी असे महिलेचे नाव असून ती २० आॅगस्ट रोजी प्रसूतीसाठी वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल झाली होती. मंगळवारी तिची प्रसूती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. यामुळे प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात हलविले होते. त्यापूर्वी पालिका रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तिथल्या डॉक्टरांसोबत बोलून घटनेची माहिती दिली होती. मात्र मंगळवारी रात्री ही महिला रुग्णवाहिकेतून त्याठिकाणी गेली असता, खाट उपलब्ध नसल्याचे सांगून त्यांना परत पाठविले. त्यानुसार वाशीतील पालिका रुग्णालयातच या महिलेवर उपचार सुरु असताना बुधवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालय व्यवस्थापनाला धारेवर धरत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. अखेर डॉक्टर व पोलिसांनी त्यांची समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला.

Web Title: The death of the woman after delivery at the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.