शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यावर असताना मृत्यू; जवानांना १० लाख रुपये द्या, हायकाेर्टाचे राज्य सरकारला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 15:27 IST

जवानांच्या विमा कवचाची रक्कम आणि सानुग्रह-अनुदानाची रक्कम नाकारताना राज्य सरकार व विमा संचालनालयाने सर्व बाबींचा विचार केला नाही. त्याचा अन्य जवानांवर मोठा परिणाम होऊ शकतो, असे न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने म्हटले.

मुंबई : नोव्हेंबर २०१८ मध्ये विहिरीत पडलेल्या तीन जणांची सुटका करताना मृत्यू झालेल्या दोन अग्निशमन दलाच्या जवानांच्या विधवा पत्नींना विमा कवचाचे प्रत्येकी दहा लाख रुपये द्या, असे निर्देश उच्च न्यायालयानेराज्य सरकारला दिले. संबंधित जवान कर्तव्य  बजावताना मद्यधुंद अवस्थेत असल्याचा दावा करत राज्य सरकारने त्यांना विमा संरक्षणाचे पैसे व सानुग्रह अनुदानाची रक्कम देण्यास नकार दिला होता.जवानांच्या विमा कवचाची रक्कम आणि सानुग्रह-अनुदानाची रक्कम नाकारताना राज्य सरकार व विमा संचालनालयाने सर्व बाबींचा विचार केला नाही. त्याचा अन्य जवानांवर मोठा परिणाम होऊ शकतो, असे न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने म्हटले. दीपा वागचौदे आणि अंजली शेलार यांनी सरकारने विमा कवचाची रक्कम व सानुग्रह अनुदानाची रक्कम नाकारल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. याचिकाकर्त्यांचे पती प्रमोद वागचौदे व अनंत शेलार हे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलात सेवेत होते. विहीर साफ करताना भोवळ येऊन विहिरीत पडलेल्या तीन सफाई कामगारांना वाचवताना प्रमोद व अनंत यांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवली महापालिकेने दोघांनाही ‘शहीद’ म्हणून घोषित केले.

न्यायालयाचे निरीक्षण काय? -  विहिरीत पडलेल्या तिघांचा व दोन जवानांच्या मृत्यूचे कारण त्यांना श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास झाला. विहिरीतील विषारी वायूमुळे बेशुद्ध पडलेल्या तीन कामगारांच्या व्हिसेरा अहवालातही तिघांच्या शरीरात ‘इथिल अल्कोहोल’ असल्याचे आढळले. -  याचीही नोंद घ्यावी लागेल. पाचही व्यक्तींच्या शरीरात अल्कोहोलचे आढळलेले घटक एकसारखेच आहे आणि हे अशक्य आहे. विहिरीतील पाण्यातही ‘इथिल अल्कोहोल’ असल्याचे लॅब टेस्टच्या अहवालात नमूद केले आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. -  यावरून याचिकाकर्तींच्या पतींचा मृत्यू विहिरीतील विषारी वायूमुळे व विहिरीत आढळलेल्या काळ्या द्रवामुळे झाल्याचे निष्पन्न होते. राज्य सरकारने त्यांचा दावा फेटाळण्याचे कोणतेही न्यायपूर्ण स्पष्टीकरण दिलेले नाही, असे न्यायालयाने म्हटले. 

टॅग्स :SoldierसैनिकHigh Courtउच्च न्यायालयState Governmentराज्य सरकार