बेस्टखाली चिरडून गोवंडीत दोन तरुणांचा मृत्यू
By Admin | Updated: December 27, 2014 04:57 IST2014-12-27T04:57:51+5:302014-12-27T04:57:51+5:30
भरधाव बाईक आणि बेस्ट बस धडकून झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी दुपारी घडली

बेस्टखाली चिरडून गोवंडीत दोन तरुणांचा मृत्यू
मुंबई : भरधाव बाईक आणि बेस्ट बस धडकून झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी दुपारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी बेस्टचालक ज्ञानोबा राजप्पा गायकवाड (५५) यांना अटक केली.
अब्दुल शाहिद (१४), नासिर अन्सारी (१५) अशी मृत तरुणांची नावे आहेत. तर तरबेज खान (१५) हा जखमी झाला आहे. तिघेही शिवाजीनगरचे रहिवासी आहेत.
तरबेज व नासिरला मागे बसवून गाडी सूसाट दामटवणाऱ्या शाहिदने ओव्हरटेक करण्याच्या नादात गाडी बसच्या डाव्या बाजूला घेतली. त्याचवेळी एक महिला रस्ता ओलांडत होती. तिला वाचवण्याच्या धडपडीत बाईक घसरली आणि तिघेही बसच्या खाली चिरडले गेले. शिवाजीनगर पोलिसांनी अब्दुल याला शताब्दी तर नासिर आणि तरबेज यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. अब्दुलचा उपचारापूर्वीच तर नासिरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.