गिरगावात बोअरवेलमध्ये पडलेल्या दोघांचा मृत्यू
By Admin | Updated: March 6, 2016 15:52 IST2016-03-06T14:43:04+5:302016-03-06T15:52:52+5:30
गिरगाव फणसवाडी येथे ४० फूट बोअरवेलमध्ये पडलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे.

गिरगावात बोअरवेलमध्ये पडलेल्या दोघांचा मृत्यू
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - दक्षिण मुंबईत गिरगावमधील फणसवाडी परिसरात रविवारी ४० फूट बोअरवेलमध्ये पडलेल्या दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. बाबासाहेब जयकर मार्गावरील जवाहर मॅन्शन सोसायटीच्या परिसरातील अडीच फूट व्यासाच्या आणि ४० फूट खोल बोअरवेलमध्ये रविवारी दुपारी दोघेजण पडले.
अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच दुपारी साडेबाराच्या सुमारास अग्निशमन दलाचे पथक तात्काळ दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरु केले.
दोरीच्या शिडीच्या सहाय्याने आत अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात आले. मात्र दोघांची प्रकृती गंभीर होती. त्यांना तात्काळी जीटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.