स्फोटातील दोघांचा मृत्यू
By Admin | Updated: December 24, 2014 09:20 IST2014-12-24T02:52:14+5:302014-12-24T09:20:42+5:30
वसई रोड आनंदनगर भागात झालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात चारजण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला.

स्फोटातील दोघांचा मृत्यू
वसई : वसई रोड आनंदनगर भागात झालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात चारजण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला.
वसई रोड पश्चिम भागातील आनंदनगर येथे दोन दिवसांपूर्वी महावितरण ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला होता. या घटनेमध्ये रेहमतुल्ला, साबीर सली, सराजुद्दीन मन्सुरी व सचिन गुप्ता हे चारजण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी रेहमतुल्ला व साबीर अलीचा रविवारी मृत्यू झाला. यास महावितरण जबाबदार असल्याचा आरोप रेहमतुल्ला यांच्या नातेवाइकांनी केला. कुंपण उभारले असते तर तीव्रता कमी प्रमाणात जाणवली असती. त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)