दोन चिमुरड्यांचा विहिरीत पडून मृत्यू

By Admin | Updated: September 10, 2016 04:48 IST2016-09-10T04:48:17+5:302016-09-10T04:48:17+5:30

अकोले तालुक्यातील शेणीत बुद्रुक येथील इंदिरा (३) व संकेत दत्तू धोंगे (दीड वर्ष) या दोन चिमुरड्यांचा विहिरीत बुडून मृत्यू

The death of two chicks in a well in the well | दोन चिमुरड्यांचा विहिरीत पडून मृत्यू

दोन चिमुरड्यांचा विहिरीत पडून मृत्यू


राजूर (अहमदनगर) : अकोले तालुक्यातील शेणीत बुद्रुक येथील इंदिरा (३) व संकेत दत्तू धोंगे (दीड वर्ष) या दोन चिमुरड्यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली़
इंदिरा व संकेतची आई गुरुवारी रात्रीपासून आजारी होती. शुक्रवारी मुलांना घेऊन त्यांची आई डॉक्टरकडे तपासणीसाठी गेली. घरी परतताना तिला रस्त्यात चक्कर आली. ती खाली बसली. काही वेळाने शुद्धीवर आल्यावर तिने मुलांचा शोध घेतला़ तेव्हा ती जवळच्या विहिरीत पडल्याचे तिला दिसले़ तिने आरडाओरडा करताच एक शेतकरी धावत आला, त्याने मुलांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र मुले गतप्राण झाली होती़ याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे़ (वार्ताहर)

Web Title: The death of two chicks in a well in the well