पुण्यात कारच्या धडकेत तिघा विद्यार्थ्यांचा मृत्यू
By Admin | Updated: July 22, 2015 12:51 IST2015-07-22T10:20:20+5:302015-07-22T12:51:20+5:30
पुण्यातील निगडी येथे भरधाव वेगात असलेल्या गाडीने दोन दुचाकींना धडक दिल्याने दुचाकीवरील तिघा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली.

पुण्यात कारच्या धडकेत तिघा विद्यार्थ्यांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २२ - पुण्यातील निगडी येथे भरधाव वेगात असलेल्या गाडीने दोन दुचाकींना धडक दिल्याने दुचाकीवरील तिघा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. या अपघातात दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून स्थानिकांनी कारचालकाला पोलिसांच्या हवाली केले आहे.
शिक्षणासाठी पुण्यात आलेले पाच विद्यार्थी दोन बाईकवरुन बुधवारी पहाटे चहा पिण्यासाठी निगडीतील जकात नाक्याजवळ आले होते. चहा पिऊन परतत असताना भरधाव वेगात असलेल्या कारने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की तिघा विद्यार्थ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात अन्य दोघे विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर कारचालक पळ काढण्याच्या प्रयत्नात होता, मात्र स्थानिकांनी त्याला रोखून पोलिसांच्या हवाली केले. या कारचालकाचे नाव मयूर घुमटकर (वय २९) असे असून अपघाताच्या वेळी तो मद्यधूंद अवस्थेत होता असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. किरण दहाने (वय २४), संकेत समेळ (वय २३), शुभम भालेकर (वय २३) अशी या मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.तर अविनाश माने व शिनो जॉन हे दोघे या अपघातात जखमी झाले आहेत.