शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

कुटुंबीयांच्या मारहाणीत चोरट्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 2:31 AM

पैशाची चणचण दूर करण्याच्या हेतूने चोरीचा कट रचून बनारसहून मित्राला बोलाविले. दोघांनी एका घरात चोरीच्या बेताने प्रवेश केला.

चंद्रपूर : पैशाची चणचण दूर करण्याच्या हेतूने चोरीचा कट रचून बनारसहून मित्राला बोलाविले. दोघांनी एका घरात चोरीच्या बेताने प्रवेश केला. याची कुणकुण लागताच घरातील मंडळी जागी झाली आणि चोरांचा प्रतिकार सुरू केला. अशातच झालेल्या झटापटीत चोरट्याकडून हिसकावलेल्या चाकूनेच केलेल्या उलट वारात चोरट्याचा खून झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही थरारक घटना चंद्रपुरातील राजीव गांधी नगरात बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली.या प्रकरणी रामनगर पोलिसांनी घरातील चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. रितेश गुप्ता (२४ रा. बनारस) असे मृताचे नाव आहे. पंकज उर्फ सुयोग राम प्रवेशसिंह ठाकूर (२८ रा. संजयनगर, चंद्रपूर) हा गंभीर जखमी झाला आहे.पंकज ठाकूर व रितेश गुप्ता हे दोघे मित्र. पैशाची चणचण असल्याने पंकजने सुजीत हलदर यांच्या घरी चोरीचा कट रचला. ही चोरी करण्यासाठी त्याने रितेशला बनारसवरुन बोलाविले. दोघांनी मध्यरात्री हलधर यांच्या घरात प्रवेश केला. घराचा दरवाजा सहज उघडला. कुणीतरी दरवाजा उघडून आत येत असल्याची चाहूल हलदर यांना लागताच त्यांनी आरडाओरड सुरू केली. यावेळी हलदर यांची दोन्ही मुले जागी झाली. यानंतर हलदर कुटुंबाने त्या दोन्ही चोरट्यांना पकडले. बचावासाठी रितेशने त्यांना चाकूचा धाक दाखवताच हलदरच्या मुलांनी त्याच्या हातून चाकू हिसकावला. दरम्यान त्यांच्यामध्ये चांगलीच झटापट झाली. अशातच रितेश गुप्ताच्या पाठीवर चाकू लागला आणि तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यानंतर हलदर परिवाराने त्या दोघांनाही काठीने जबर मारहाण केली. यानंतर त्यांनीच या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना दिली.रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांनी घटनास्थळ गाठले. जखमी दोघा चोरट्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी रितेशला मृत घोषित केले. पोलिसांनी सुुजीत हलदर (५५), अर्चना हलदर (५०), सुजम हलदर(२२), सुभ्रत हलदर (२५) यांच्याविरुद्ध कलम ३०२, ३०७ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :theftचोरीCrimeगुन्हा