शाळेतील खिडकीतून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
By Admin | Updated: February 24, 2015 15:16 IST2015-02-24T15:13:21+5:302015-02-24T15:16:20+5:30
शाळेच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीतून पडून सहावीच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना पनवेलमध्ये घडली आहे.

शाळेतील खिडकीतून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
पनवेल, दि. २४ - शाळेच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीतून पडून सहावीच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना पनवेलमध्ये घडली आहे.याप्रकरणी मुलाच्या पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात हलगर्जीपणा केल्याची तक्रार दाखल केली आहे.
पनवेलमधील खांदेश्वर परिसरात एका ख्यातनाम इंग्रजी शाळेत गौरव कंक हा विद्यार्थी सहावीत शिकत होता. गौरवचा वर्ग शाळेतील चौथ्या मजल्यावर होता. या वर्गातीस खिडक्यांना ग्रील लावण्यात आली नव्हती. गौरव खिडकीतून बघत असताना त्याचा तोल गेला व खिडकीतून खाली पडला. गौरवचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. वर्गातील खिडक्यांना ग्रील न लावल्याचा पालकांचा आरोप आहे. या हलगर्जीपणासाठी शाळा प्रशासनाविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी पनवेल पोलिस पुढील तपास करत आहे.