आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

By Admin | Updated: July 23, 2016 04:08 IST2016-07-23T04:08:37+5:302016-07-23T04:08:37+5:30

एटापल्ली तालुक्यातील गोमणी येथील भगवंतराव प्राथमिक तथा माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेतील दुसरीच्या विद्यार्थिनीचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला.

Death of a student of the ashram school | आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू


गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील गोमणी येथील भगवंतराव प्राथमिक तथा माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेतील दुसरीच्या विद्यार्थिनीचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. रिंकू देवू गोटा (रा. हेडरी, ता. एटापल्ली) असे तिचे नाव असून ती तीन दिवसांपासून आजारी होती.
आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी बुधवारी रिंकूला मुलचेराच्या रुग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी अचानक तिची प्रकृती खालावल्याने आश्रमशाळेच्या महिला अधिक्षिका मिताली गवई व मुख्याध्यापक जे. बी. पुस्तोडे यांनी तिला अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. चामोर्शीनजीक वाटेतच रिंकूचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Death of a student of the ashram school