पोलीस कर्मचा-याचा सरावादरम्यान मृत्यू

By Admin | Updated: November 7, 2016 12:03 IST2016-11-07T11:57:22+5:302016-11-07T12:03:02+5:30

पुण्यातील हडपसर येथील एसआरपीएफ मैदानावर एका पोलीस कर्मचा-याचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला आहे. राम नागरे असे मृत पोलिसाचे नाव आहे.

Death of the police personnel | पोलीस कर्मचा-याचा सरावादरम्यान मृत्यू

पोलीस कर्मचा-याचा सरावादरम्यान मृत्यू

ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. 7 - हडपसर येथील एसआरपीएफ मैदानावर एका पोलीस कर्मचा-याचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला आहे. राम नागरे असे मृत पोलिसाचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी सुरू असलेल्या सरावादरम्यानची ही घटना आहे.
 
सोमवारी सकाळी पोलीस खात्या अंतर्गत होणा-या पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या सरावासाठी नागरे वरिष्ठ पोलीस अधिका-यांची परवानगी घेऊन एसआरपीएफ मैदानावर पोहोचले. यावेळी सरावादरम्यान नागरे यांना अचानक त्रास जाणवू लागला.
 
यानंतर त्यांना तातडीने जवळील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना  मृत घोषित केले.
 
नागरे सध्या पोलीस नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत होते. ते मूळचे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कौडगाव येथील रहिवासी होते.  2008 साली ते पुणे पोलीस दलात भरती झाले होते. 
 

Web Title: Death of the police personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.