तरणतलावात एकाचा मृत्यू
By Admin | Updated: March 6, 2017 05:09 IST2017-03-06T05:09:58+5:302017-03-06T05:09:58+5:30
एमजीएम कॅम्पसमधील स्वीमिंग पुलात पोहण्यासाठी गेलेल्या एक जणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

तरणतलावात एकाचा मृत्यू
औरंगाबाद : एमजीएम कॅम्पसमधील स्वीमिंग पुलात पोहण्यासाठी गेलेल्या एक जणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास घडली. रमेश मुरलीधर घोडके (४५, रा. संघर्षनगर, मुकुंदवाडी) असे मयताचे नाव आहे. रमेश हे शनिवारी सकाळी एमजीएम कॅम्पसमधील स्वीमिंग पूल येथे पोहण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत परिसरातील काही मित्रही होते. पोहत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते पाण्याबाहेर येऊ लागले आणि कोसळले. यावेळी त्यांना बेशुद्धावस्थेत एमजीएम रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी रमेश यांना तपासून मृत घोषित केले. (प्रतिनिधी)