भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
By Admin | Updated: February 13, 2016 18:27 IST2016-02-13T18:22:43+5:302016-02-13T18:27:57+5:30
ण्यातील हिंजवडी जवळील माण गावातील बोडकेवाजी येथे एका दीड वर्षांच्या मुलाचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला.

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
>ऑनलाइ लोकमत
पुणे, दि. १३ - पुण्यातील हिंजवडी जवळील माण गावातील बोडकेवाजी येथे एका दीड वर्षांच्या मुलाचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. शनिवारी सकाळी ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. संदीप शावाप्पा नाटेकर असे त्या मुलाचे नाव असून तो संदीपवीटभट्टीवर काम करणा-या मजूर दांपत्याचा मुलगा होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माण गावच्या हद्दीत असलेल्या बोडकेवाडी येथील एका वीटभट्टीवर नाटेकर कुटुंबीय मजूर म्हणून काम करत होते व एका कुडाच्या घरात रहात होते. त्यांच्या घराला दरवाजाही नाही. शुक्रवारी रात्री नाटेकर कुटुंबिय घरात झोपले, पण मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा दीड वर्षांचा मुलगा संदीप जागा झाला आणि खेळता खेळता बाहेर गेला. मात्र परिसरातील भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवत त्याला अनेक चावे घेतले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला, त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याचे वडील जागे झाले आणि बाहेर आले असता त्यांना संदीप जखमी अवस्थेत आढळला. त्यांनी संदीपला तातडीने रुग्णालयात दाखल केले, पण उपचारांपूर्वीच त्या चिमुकल्याचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरातील नागरिक प्रचंड संतापले असून सर्वत्र उच्छाद घालणा-या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली.