सेल्फी काढताना तरुणीचा मृत्यू
By Admin | Updated: June 3, 2017 02:32 IST2017-06-03T02:32:15+5:302017-06-03T02:32:15+5:30
कासारसाई (ता. मावळ) येथील धरण परिसरात वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणींना मोबाईलवर सेल्फी काढण्याचा

सेल्फी काढताना तरुणीचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव दाभाडे : कासारसाई (ता. मावळ) येथील धरण परिसरात वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणींना मोबाईलवर सेल्फी काढण्याचा मोह चांगलाच महागात पडला. सेल्फी कढताना तोल जाऊन पाण्यात पडल्याने एक तरुणी बुडून मृत्युमुखी पडली. तर कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थांनी दाखविलेल्या प्रसंगावधनाने दुसऱ्या तरुणीचे प्राण वाचविण्यास यश आले आहे.
शुभांगी राम पाटील (वय २१, रा. सुसरोड, पुणे) असे पाण्यात बुडून मृत झालेल्या युवतीचे नाव आहे. ही दुर्घटना बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कासारसाई धरणातील पाणलोट क्षेत्रात घडली.
स्नेहल ससाणे (वय २२, रा. सांगवी, पुणे) या युवतीला स्थानिकांच्या प्रसंगावधनाने जीवदान मिळाले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभांगी पाटील व स्नेहल ससाणे या दोघी मैत्रिणी शिवाजीनगर येथील एचडीएफसी बँकेत कामाला होत्या. शुभांगी पाटील हिचा बुधवारी (दि. ३१) वाढदिवस असल्याने त्या दोघी फिरण्यासाठी कासारसाई धरण परिसरात कुसगाव (पवन मावळ) हद्दीत आल्या होत्या. त्यांनी धरण परिसरात मोबाईलमध्ये सेल्फी काढले. धरणाच्या पाणलोटक्षेत्रात मोबाईलमध्ये फोटो काढताना तोल जाऊन त्या दोघी पाण्यात पडल्या.