लग्नाच्या बोहल्यावर चढलेल्या नवरदेवाचा मृत्यू
By Admin | Updated: April 26, 2016 23:20 IST2016-04-26T23:20:13+5:302016-04-26T23:20:13+5:30
लग्नाच्या बोहल्यावर चढल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्यानं एका नवरदेवाचा मृत्यू झाला आहे.

लग्नाच्या बोहल्यावर चढलेल्या नवरदेवाचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. 26- पंढरपूर तालुक्यातील देगावजवळील शिंदे वस्तीमध्ये जिल्ह्यात लग्नाच्या बोहल्यावर चढल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्यानं एका नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळच्या सुमारास शेवटची अक्षता पडत असताना शैलेंद्र शिवाजी शिंदे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लग्नादरम्यान पारण्याच्या वेळेस व-हाड मंडळीतल्या दोन गटांत तुफान भांडण झाले. त्या भांडणाच्या तणावामुळे नवरदेवाला हृदयविकाराचा धक्का बसल्याची नातेवाईकांनी माहिती दिली.