बाराव्या मजल्यावरून पडून वाकडमध्ये मजुराचा मृत्यू
By Admin | Updated: July 23, 2016 23:07 IST2016-07-23T23:07:11+5:302016-07-23T23:07:11+5:30
वाकड, कस्पटेवस्ती येथील युनिक डेव्हलपर्सच्या बांधकाम साईटवर प्लॅस्टरचे काम करत असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास १२ व्या मजल्यावरून खाली पडल्याने मजुराचा जागीच मृत्यू झाला.

बाराव्या मजल्यावरून पडून वाकडमध्ये मजुराचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. २३ - वाकड, कस्पटेवस्ती येथील युनिक डेव्हलपर्सच्या बांधकाम साईटवर प्लॅस्टरचे काम करत असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास १२ व्या मजल्यावरून खाली पडल्याने मजुराचा जागीच मृत्यू झाला.
वाकड पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक शरद जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाराव्या मजल्यावरून पडून मृत्यूमुखी पडलेल्या मजुराचे नाव राजकुमार आहेर धुतलहरे (वय ५०,रा.मूळचा छत्तीसगड) असे आहे. बाराव्या मजल्यावर प्लॅस्टरचे काम सुरू होते. त्यावेळी डक्टमधून वर पाठविण्यात येणारा माल प्लॅस्टरसाठी पुरविण्याचे काम हा मजुर करत होता. त्याला ठेकेदाराने कोणतीही सुरक्षा साधने पुरवली नव्हती. तोल जाऊन खाली पडल्याने मजुराचा जागीच मृत्यू झाला. वाकड पोलीस ठाण्यात त्याची आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली असली तरी अधिक माहिती घेऊन ठेकेदाराविरूद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.