पाण्याच्या टाकीवरुन पडून मजुराचा मृत्यू
By Admin | Updated: November 1, 2016 17:39 IST2016-11-01T17:39:16+5:302016-11-01T17:39:16+5:30
येथील नगर परिषदेच्या नवीन पाण्याच्या टाकीवरुन पडून परभणी येथील १९ वर्षीय इमरान नावाचा मजूर जागीच ठार झाल्याची घटना १ नोव्हेंबर रोजी घडली.

पाण्याच्या टाकीवरुन पडून मजुराचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
मंगरुळपीर (वाशिम), दि. 01 - येथील नगर परिषदेच्या नवीन पाण्याच्या टाकीवरुन पडून परभणी येथील १९ वर्षीय इमरान नावाचा मजूर जागीच ठार झाल्याची घटना १ नोव्हेंबर रोजी घडली.
नगर परिषदेच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे. पाच-सात मजूर या बांधकामावर असून, नेहमीप्रमाणे मंगळवारी पाच मजूर कामावर हजर झाले. दुपारी ३ ते ३.३० च्या दरम्यान पाण्याच्या टाकीवरुन एक मजूर खाली एका घरावर कोसळला. यामध्ये त्याला गंभीर इजा झाल्याने तो जागीच ठार झाला. मृतकाचे नाव इमरान असे असून, तो परभणी येथील असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात मंगरुळपीर पोलीस पुढील तपास करीत आहेत.