पत्नीची हत्या करुन पळून जाणा-या पतीचा अपघातात मृत्यू

By Admin | Updated: November 12, 2016 10:01 IST2016-11-12T10:03:15+5:302016-11-12T10:01:07+5:30

पत्नीची हत्या केल्यानंतर फरार झालेल्या आरोपी पतीचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Death in a husband's accident by killing his wife | पत्नीची हत्या करुन पळून जाणा-या पतीचा अपघातात मृत्यू

पत्नीची हत्या करुन पळून जाणा-या पतीचा अपघातात मृत्यू

>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 12 - पत्नीची हत्या केल्यानंतर फरार झालेल्या आरोपी पतीचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मनोज गुरुले याने पोटगीच्या वादातून पत्नी अश्विनी गुरुलेची चाकूने भोसकून हत्या केली. हत्या करुन पळून जात असताना औरंगाबाद-नाशिक रोडवर त्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. विश्वासभारती कॉलनीतील वक्रतुंड कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली. 
 
अश्विनी गुरुले आणि पती मनोज गुरुले गेल्या तीन वर्षांपासून वेगळे राहत होता. त्यांच्यात पोटगीवरुन वाद सुरु होता. यावरुनच मनोजने शुक्रवारी चाकूने वार करुन अश्विनीची हत्या केली. हत्या केल्यानंतर कारने पळून जात असताना औरंगाबाद-नाशिक रोडवर गाडीवरील नियंत्रण सुटल्यान मनोजचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
 

Web Title: Death in a husband's accident by killing his wife