24 वर्षीय RJचा लाईव्ह शोमध्ये हार्ट अॅटकने मृत्यू
By Admin | Updated: October 20, 2016 23:21 IST2016-10-20T19:48:12+5:302016-10-20T23:21:03+5:30
नागपुरमध्ये 24 वर्षीय रेडियो जॉकी शुभम केचे याचा लाईव्ह शो दरम्यान ह्रदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला.

24 वर्षीय RJचा लाईव्ह शोमध्ये हार्ट अॅटकने मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 20 - नागपुरमध्ये 24 वर्षीय रेडियो जॉकी शुभम केचे याचा लाईव्ह शो दरम्यान ह्रदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला.
नेहमीप्रमाणे रेडिओ मिर्ची म्हणजे 98.3 एफएम वाहिनीमध्ये सकाळी 7 ते 11 दरम्यान त्याचा ‘हाय नागपूर’ हा शो सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली. सकाळी 9.30 च्या सुमारास लाईव्ह शोदरम्यान ब्रेक घेतला असतानाच त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला. ब्रेकमध्ये तो शौचालयात गेला होता मात्र ब्रेक संपल्यावरही तो न परतल्यामुळे सहकाऱ्यांनी शोधाशोध केली असता तो बेशुद्धावस्थेत आढळला होता.
त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. शुभमच्या अकाली जाण्याने नागपुरकरांवर शोककळा पसरली आहे, तर त्याच्या सहका-यांना जबर धक्का बसला आहे.