ठाण्यात गोविंदाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By Admin | Updated: August 18, 2014 18:25 IST2014-08-18T17:58:22+5:302014-08-18T18:25:35+5:30
ठाण्यातील दहीहंडी उत्सवात नाचताना एका गोविंदाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे दुर्दैवी घटना घडली आहे.

ठाण्यात गोविंदाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. १८ - ठाण्यातील दहीहंडी उत्सवात एका गोविंदाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राजेंद्र आंबेकर असे गोविंदाचे नाव असून ते लालबागमधील साईसदन गोविंदा पथकासोबत ठाण्यात आले होते.
ठाण्यातील वर्तकनगर येथील दहीहंडी उत्सवासाठी मुंबईतील लालबागमधील गोविंदा पथक आले होते. या पथकातील राजेंद्र आंबेकर (वय ४९) हे नाचत असताना अचानक खाली पडले. यानंतर त्यांना ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.