मुंबईत पेव्हर ब्लॉकमुळे झालेल्या अपघातात तरुणीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2017 16:16 IST2017-02-11T16:16:55+5:302017-02-11T16:16:55+5:30
पेव्हर ब्लॉकमुळे तरुणीचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जोगेश्वरीत घडली आहे

मुंबईत पेव्हर ब्लॉकमुळे झालेल्या अपघातात तरुणीचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - पेव्हर ब्लॉकमुळे तरुणीचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जोगेश्वरीत घडली आहे. पेव्हर ब्लॉकमुळे दुचाकीचा टायर घसरुन तरुणीचा अपघात झाला. अपघातानंतर बसने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला असून तिच्यासोबत असणारी तरुणी जखमी झाली आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील प्रतापनगर बसस्टॉपजवळच्या धुर्व मोटार्स समोर हा अपघात झाला.
ईशा निलेश गोटे असं या मृत तरुणीचं नाव आहे. ईशा दुचाकीवरुन आपल्या मैत्रीणीसोबत जात असताना गाडीचं चाक घसरल्याने ती रस्त्यावर पडली. यावेळी मागून येणा-या बसने ईशाने चिरडलं, ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. ईशासोबत असणारी तिची मैत्रीण अक्षता मालाडकर जखमी झाली आहे. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.