गँगस्टर मांडवेचा मृत्यू गळफासामुळे
By Admin | Updated: November 2, 2016 05:38 IST2016-11-02T05:38:46+5:302016-11-02T05:38:46+5:30
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी टोळीतील गँगस्टर अशोक मांडवे याचा मृत्यू गळफासानेच झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले

गँगस्टर मांडवेचा मृत्यू गळफासामुळे
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी टोळीतील गँगस्टर अशोक मांडवे याचा मृत्यू गळफासानेच झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. मात्र घटनेच्या आदल्या रात्री शिर्डीला जातो असे सांगून घराबाहेर पडलेला मांडवे नक्की कुठे गेला होता, याचा शोध कांजूरमार्ग पोलीस घेत आहेत.
कांजुर येथील नेहरु नगर परिसरात कुटुंबियांसोबत राहत असलेले मांडवे यांचा शुक्रवारी गळफास घेतलेल्या अवस्थेतील मतदेह सापडला. दुपारी दोनच्या सुमारास त्यांचा मृतदेह पत्नीला आढळून आला. आदल्या रात्री ते शिर्डीला जातो असे सांगून घराबाहेर पडले होते. आणि पहाटेच्या सुमारास घरी परतल असल्याची माहिती समजते.
मात्र ते शिर्डीला गेले होते का, किंवा तेथे असे काय झाले, त्यामुळे मांडवेवर मृत्यू ओढावला. मांडवेंचे शिर्डीला येणे जाणे होते. मात्र त्यांच्या मृत्यू मागे शिर्डी कनेक्शन आहे का, याचा तपास करत आहोत, असे कांजुर पोलिसांनी सांगितले.
मंगळवारी त्यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालात
त्यांचा मत्यू गळफासामुळेचे झाल्याचे स्पष्ट झाले असल्याचे कांजूर
पोलीस ठाण्याचे वरिष्ठ
निरिक्षक ए. एल. सातपुते यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती सातपुते यांनी दिली. (प्रतिनिधी)