माजी उपसरपंचांचा मारहाणीत मृत्यू

By Admin | Updated: August 2, 2016 01:47 IST2016-08-02T01:47:19+5:302016-08-02T01:47:19+5:30

वडेश्वर ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मधुकर मोरमारे (वय ४ ५, रा. मोरमारवाडी) यांचा वडगाव मावळ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी मृत्यू झाला.

The death of the former sub-sections | माजी उपसरपंचांचा मारहाणीत मृत्यू

माजी उपसरपंचांचा मारहाणीत मृत्यू


टाकवे बुदु्रक : पंधरा दिवसांपूर्वी पर्यटकांनी मारहाण केल्याने वडेश्वर ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मधुकर मोरमारे (वय ४ ५, रा. मोरमारवाडी) यांचा वडगाव मावळ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी मृत्यू झाला.
मारहाण करणाऱ्या पर्यटकांवर खुनाचा गुन्हा अ‍ॅट्रासिटीखाली दाखल करावा, अशी मागणी करून जोपर्यंत आरोपींना पकडत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी मागणी आदिवासी मोरमारे कुटुंबाने मागणी केल्याने तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी अभिलाश नितीन म्हाळसकर (वय २०) आणि ओंकार ऊर्फ दादा जितेन्द्र हेरणकर (वय २०, दोघे रा. म्हाळसकरवाडी, वडगाव मावळ) या दोन आरोपींना अटक केली आहे. तीन आरोपी फरार आहेत. शिवसेना तालुकाप्रमुख राजू खांडभोर यांनी समजाविल्यानंतर मृताच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. या तीन आरोपींचा शोध सहायक पोलीस निरीक्षक लोकरे घेत आहे.
आदिवासी गावात असा प्रकार घडल्याने खळबळ माजली होती. बेदम मारहाण झालेल्या मोरमारे यांच्यावर वडगावातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांची मृत्यूशी झुंज सोमवारी संपुष्टात आली. (वार्ताहर)
>वडगाव मावळ येथील पर्यटक हुल्लडबाजी करीत गाडी चालवत असताना गाडीचा धक्का मधुकर मोरमारे यांना लागला. त्यामुळे त्यांची पर्यटकांबरोबर बाचाबाची झाली होती. युवकांनी याचा मनात राग धरून पुन्हा मोरमारवाडीत येऊन मोरमारे यांना मारहाण केली होती. त्यांनी परिसरात दहशतीचे वातावरण तयार केले.

Web Title: The death of the former sub-sections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.