विषारी औषध जेवणात मिसळल्याने वडील आणि मुलाचा मृत्यु

By Admin | Updated: July 7, 2016 18:10 IST2016-07-07T18:10:32+5:302016-07-07T18:10:32+5:30

पूर्वेतील जरीमरी हॉस्पिटल समोर रहाणाऱया मुसळे कुटूंबातील वडील व मुलाचा वीषबाधा झाल्याने मृत्यु झाला आहे तर आईची प्रकृती चिंताजनक असून ती रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे.

The death of the father and child due to mixing poisonous medicine in the dinners | विषारी औषध जेवणात मिसळल्याने वडील आणि मुलाचा मृत्यु

विषारी औषध जेवणात मिसळल्याने वडील आणि मुलाचा मृत्यु

ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. ७ - पूर्वेतील जरीमरी हॉस्पिटल समोर रहाणाऱया मुसळे कुटूंबातील वडील व मुलाचा वीषबाधा झाल्याने मृत्यु झाला आहे तर आईची प्रकृती चिंताजनक असून ती रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे.

घरात उंदरांचा उपद्रव वाढल्याने त्यांनी घरात उंदीर मारण्याचे औषध फवारले होते. परंतू त्याचे काही अंश जेवणातही मिसळले. दुपारी जेवण केल्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. घरातील पती पत्नी व त्यांचा मुलगा यांना वीषबाधा झाली.

उपचारासाठी त्यांना रेल्वे रुग्णालयात दाखल केले असता. उपचारादरम्यान गेणू बैरु मुसळे (५६), त्यांचा मुलगा अमोल गेणू मुसळे (१५) यांचा मृत्यु झाला आहे. तर अंजना गेणू मुसळे (५०) या रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती पोिलसांनी दिली.

Web Title: The death of the father and child due to mixing poisonous medicine in the dinners