गरम पाण्यासह वाफ घशात गेल्याने मृत्यू

By Admin | Updated: February 12, 2015 02:58 IST2015-02-12T02:58:16+5:302015-02-12T02:58:16+5:30

लग्नाच्या वाढदिवशी घरगुती अपघातात प्राण गमवावे लागण्याचे दुर्दैव येथील विजय नरहरी गुरव (३८) यांच्या वाट्याला आले.

Death due to vapor suffocation with hot water | गरम पाण्यासह वाफ घशात गेल्याने मृत्यू

गरम पाण्यासह वाफ घशात गेल्याने मृत्यू

सातारा : लग्नाच्या वाढदिवशी घरगुती अपघातात प्राण गमवावे लागण्याचे दुर्दैव येथील विजय नरहरी गुरव (३८) यांच्या वाट्याला आले.
बुधवारी सकाळी विजय घरासमोर पाण्याचा बंब पेटविण्याचा प्रयत्न करीत होते. तथापि, बंबातून पाणी बाहेर न आल्याने त्यांनी बंबाच्या खालील बाजूस रबरी तोटी जोडून तोंडाने हवा ओढण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी तोटीत अडकलेला कचरा निघाला व वाफेसह गरम पाणी जोराने क्षीरसागर यांच्या तोंडात गेले आणि त्यांच्या श्वसननलिकेला इजा झाली. (प्रतिनिधी)

Web Title: Death due to vapor suffocation with hot water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.