कोल्हापूरमध्ये डॉक्टर दांपत्याची हत्या

By Admin | Updated: August 9, 2016 12:39 IST2016-08-09T12:30:10+5:302016-08-09T12:39:33+5:30

कोल्हापूरमधील हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील वृद्‍ध डॉक्‍टर दांपत्‍याची अज्ञातांनी हत्‍या केली.

The death of a doctor couple in Kolhapur | कोल्हापूरमध्ये डॉक्टर दांपत्याची हत्या

कोल्हापूरमध्ये डॉक्टर दांपत्याची हत्या

>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. ९ - कोल्हापूरमधील  हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील वृद्‍ध डॉक्‍टर दांपत्‍याची अज्ञातांनी हत्‍या केली आहे. डॉ. उद्‍धव कुलकर्णी व डॉ. प्रज्ञा कुलकर्णी असे या मृत दांपत्‍याचे नाव असून चोरी करण्याच्या दृष्टीने आलेल्या अज्ञात व्यक्तीने खून केल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.
या घटनेची अधिक माहिती अशी की, कुलकर्णी दांपत्‍य हे रुकडी येथील सरकारी रुग्‍णालयासमोर अनेक वर्षापासून वास्‍तव्‍यास आहे. येथेच त्‍यांचा स्‍वतचा दवाखाना असून अनेक वर्षे ते रुग्‍णांची सेवा करत आहेत. त्‍यांना अपत्‍य नसल्‍याने ते दोघेच रहात होते. मंगळवारी सकाळी ब-याच वेळानंतरही त्यांच्या घराचा दरवाजा न उघडल्याने लोकांनी अधिक तपास केला असता त्यांची हत्या झाल्याचे उघड झाले.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्‍यात आला आहे. दोन्‍ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्‍णालयात पाठविण्‍यात आले असून अधिक तपास करत चालू आहे. या दाम्‍पत्‍याने रुग्‍णांची मनोभावे व अल्‍प दरात सेवा केली असल्‍याने त्‍यांचा कोणी शत्रू असेल असे वाटत नाही. हा खून पहाटे  चोरीच्‍या प्रयत्‍नातून झाला असल्‍याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

Web Title: The death of a doctor couple in Kolhapur