बॅटरी चोरीच्या संशयावरून जाळण्यात आलेल्या मुलाचा मृत्यू
By Admin | Updated: January 15, 2016 16:16 IST2016-01-15T16:15:57+5:302016-01-15T16:16:22+5:30
दुचाकीची बॅटरी चोरल्याच्या संशयावरून अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आलेल्या सावन राठोड या मुलाचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला

बॅटरी चोरीच्या संशयावरून जाळण्यात आलेल्या मुलाचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १५ - दुचाकीची बॅटरी चोरल्याच्या संशयावरून अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आलेल्या सावन राठोड या मुलाचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुण्यातील कसबा पेठ परिसरात बुधवारी ही घटना घडली होती. याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले होते.
पीडित अल्पवयीन मुलगा कसबा पेठ परिसरात उभ्या असलेल्या गाडयांच्या कडेला उभा राहून लघवी करत होता. त्यावेळी काही जणांनी त्याला पाहिले. हा मुलगा गाडयांचा बॅटरी चोर असावा असा स्थानिकांना संशय आला. त्यांनी या मुलाला हटकले व मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर काही जणांनी त्याच्या अंगावर पेट्रोल टाकले व त्याला पेटवून दिले. त्या घटनेत तो मुलगा ६५ टक्के भाजला, उपचारांसाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.