चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या अंबरनाथमधील सेना नगरसेवकाचा मृत्यू
By Admin | Updated: December 25, 2015 15:01 IST2015-12-25T15:00:50+5:302015-12-25T15:01:07+5:30
अज्ञातांनी केलेल्या चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेले शिवसेना नगरसेवक रमेश गुंजाळ यांचा आज मृत्यू झाला.

चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या अंबरनाथमधील सेना नगरसेवकाचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
अंबरनाथ, दि. २५ - अज्ञातांनी केलेल्या चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेले शिवसेना नगरसेवक रमेश गुंजाळ यांचा आज मृत्यू झाला. रमेश गुंजाळ हे आज सकाळी १० च्या सुमारास घरातून बाहेर पडले असता, काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यार हल्ला करत चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले गुंजाळ यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होत. मात्र उपचारांदरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुंजाळ यांच्यावर हा हल्ला कोणी व का केला हे मात्र अद्याप समजू शकलेले नसून पोलिस पुढील तपास करत आहेत.