आरोपी दाऊद फणसेचा मृत्यू

By Admin | Updated: June 13, 2014 03:22 IST2014-06-13T03:22:26+5:302014-06-13T03:22:26+5:30

मुंबई बॉम्बस्फोटात सहभाग असलेल्या दाऊद फणसे (८९) याचा गुरुवारी प्रदीर्घ आजारपणाने जे जे रूग्णालयात मृत्यू झाला.

Death of accused Dawood Fonseka | आरोपी दाऊद फणसेचा मृत्यू

आरोपी दाऊद फणसेचा मृत्यू

मुंबई : मुंबई बॉम्बस्फोटात सहभाग असलेल्या दाऊद फणसे (८९) याचा गुरुवारी प्रदीर्घ आजारपणाने जे जे रूग्णालयात मृत्यू झाला. दुपारी साडेचारच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.
१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने दाऊद फणसेला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. बॉम्बस्फोटासाठी आवश्यक असलेले आरडीएक्स रायगड जिल्हयातील शेखाडी किनाऱ्यावर उतरवून घेतली होती.
बॉम्बस्फोटांआधी दुबईत झालेल्या बैठकीलाही तो उपस्थित होता. त्यात त्याची भेट दाऊद इब्राहिमशी झाली. पुढे आरडीएक्स पाठवतानाही दाऊदने त्याला फोन केला होता, असे पुरावे समोर आल्याने विशेष टाडा न्यायालयाने दाऊदला ही शिक्षा ठोठावली होती. दाऊदला मधुमेह, हृदयविकार आणि मेंदूचे विकार होते. आजारपणामुळे त्याला जेजेत दाखल करण्यात आले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Death of accused Dawood Fonseka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.