भीषण आगीत ४ जणांचा मृत्यू

By Admin | Updated: December 16, 2015 20:39 IST2015-12-16T19:32:14+5:302015-12-16T20:39:44+5:30

पुणे येथिल कोथरुडच्या डाव्या भुसारी कॉलनीत शेडला लागलेल्या भीषण आगीत होरपळून ४ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती कोथरूड पोलिसांनी दिली आहे.

The death of 4 people in a fierce fire | भीषण आगीत ४ जणांचा मृत्यू

भीषण आगीत ४ जणांचा मृत्यू

 पुणे, दि. १६ - पुणे येथिल कोथरुडच्या डाव्या भुसारी कॉलनीत शेडला लागलेल्या भीषण आगीत होरपळून ४ जणांचा मृत्यू झाला असल्याची धकादायक घटना घडली आहे. तर या जिवघेण्या आगीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. डाव्या भुसारी कॉलनीतील मयुरेश डायनिंग हॉलशेजारील शेडमधे ही आग लागली होती, शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आगीत अडकलेल्या पैकी ४ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. तर जखमीला उपचारासाठी जवळील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी डाव्या भुसारी कॉलनीच्या परिसरातील विज बंद करण्यात आली आहे. शेडमध्ये वेल्डिंगचे काम चालू होते, त्यावेळी वेल्डिंग मशिनचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचा प्रथमिक अंदाज आहे.

आग विजवण्यासाठी ६ फायरगाड्या व वॉटर टँकर घटणास्थळी दाखल झाले व आग निंयत्रणात आणन्यात आली पण त्या तिहांचे प्राण वाचवण्यात अग्निशामक दलाला यश आले नाही. सध्या आग नियंत्रणात आली आहे पण अजूनही कुलिंगचे काम सुरूच असल्याचं समजत आहे. 

 महापौर दत्तात्रय धनकवडे, नगरसवेक किशोर शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. आगीमुळं मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आहे.
 

 

Web Title: The death of 4 people in a fierce fire