क्रिकेट खेळण्याच्या वादातून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

By Admin | Updated: May 14, 2017 05:34 IST2017-05-14T05:34:30+5:302017-05-14T05:34:30+5:30

क्रिकेट खेळण्याच्या वादातून एका १६ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी धारावीत घडली

The death of a 16-year-old son is a promise to play cricket | क्रिकेट खेळण्याच्या वादातून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

क्रिकेट खेळण्याच्या वादातून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : क्रिकेट खेळण्याच्या वादातून एका १६ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी धारावीत घडली. आमिर हुसेन असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी धारावी पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांविरुद्ध हत्येचा गुन्हा
दाखल करत दोघांना ताब्यात घेतले आहे.
धारावी परिसरातील गांधी मैदानात शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आमिर त्याच्या ८ मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. त्यावेळी चार मित्रांसोबत त्याचा वाद झाला. मित्रांनी बॅट आणि स्टम्पने त्याला मारहाण केली. आमिर खाली कोसळला. ते पाहून घाबरलेल्या मुलांनी तेथून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच धारावी पोलीस तेथे दाखल झाले. आमिरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचाराअधीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी धारावी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: The death of a 16-year-old son is a promise to play cricket