तलासरीत ५ महिन्यांत कुपोषित १६ बालकांचा मृत्यू

By Admin | Updated: September 22, 2016 03:10 IST2016-09-22T03:10:41+5:302016-09-22T03:10:41+5:30

तलासरी तालुक्यात ० ते ६ वयोगटातील कमी वजनाच्या 16 बालकांचा उपचारा अभावी पाच महिन्यात मृत्यू झाल्याचे भीषण वास्तव समोर आले

Death of 16 children in malnourished in five months in Dacca | तलासरीत ५ महिन्यांत कुपोषित १६ बालकांचा मृत्यू

तलासरीत ५ महिन्यांत कुपोषित १६ बालकांचा मृत्यू

सुरेश काटे,

तलासरी- तलासरी एकात्मिक बाल विकास प्रकल्पातील कपाट घोटाळा , अंगणवाड्यामधील बोअरवेल घोटाळा गाजत असताना तलासरी तालुक्यात ० ते ६ वयोगटातील कमी वजनाच्या 16 बालकांचा उपचारा अभावी पाच महिन्यात मृत्यू झाल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.
अमृत आहार योजनेचा अनियमति येणारा निधी , बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याचे रिक्त पद, तलासरी ग्रामीण रु ग्णालयात बाल उपचार केंद्राचा अभाव, अंगणवाड्यात कोंदाटलेले वातावरण या सर्वाचा परिणाम या बालकाच्या मृत्यू मागे असून सॅम च्या श्रेणीतील बालकांची कुपोषणाकडे वाटचाल तलासरीत सुरु आहे तलासरी तालुक्यात २०४ अंगणवाड्यातसेच ४४ मिनी अंगणवाड्या अशा एकूण २४८ अंगणवाड्या आहेत या पैकी १९८ अंगणवाड्या शासकीय व ५० अंगणवाड्याया मालकीच्या जागेत चालतात या शासकीय इमारती पैकी १० इमारती मोडकळीस आल्या असून त्यांच्या बांधकामाचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे या अंगणवाड्यात ० ते ५ वयोगटातील सर्वेक्षित बालकांची संख्या वीस हजार सहाशे पंचवीस आहे.
या बालकांमध्ये ४० बालके ही सॅम ची व ३२८ बालके मॅमची आहेत. ही आकडेवारी आॅगस्ट अखेरची असून मोखाड्यातील बाल मृत्यूने खडबडून जागे झालेल्या शासनाने पूर्ण सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्यानंतर या १९ सप्टेंबरपर्यंत केलेल्या सर्वेक्षणात मॅम च्या बालकांत लक्षणीय वाढ झाली आहे. या अंगणवाड्यातील बालकांची पूर्वी दर तीन महिन्याने आरोग्य तपासणी व्हायची ती आता सहा महिन्याने होते. या तपासणीसाठी तीन आरोग्य पथके तालुक्यात कार्यरत आहेत परतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तलासरी तालुक्यात ग्रामीण रु ग्णालयात बाल उपचार केंद्रच नाही.
>अमृत आहारला निधी नाही, सेविकांना वेतन नाही
अंगणवाडीस्तरावर बाल विकास केंद्र सुरु करण्यात येऊन आठ वेळा योग्य आहार व औषध बालकांना लवकरच देण्यात येणार आहे. अशी माहिती तलासरीच्या प्रभारी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधीकारी सावंत यांनी सांगितले
अमृत आहार योजनेचा निधी आला नसल्याने बालक माता या आहारा पासून वंचित असून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन सहा महिन्यांपासून रखडले असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी केला आहे .
मातांच्या हृदयाची घालमेल
तलासरी तालुक्यातील बालकांना उपचारासाठी डहाणू येथे घेऊन जावे लागते त्यामुळे उपचारासाठी बालकाला तिथे नेण्यास त्याची माता तयार होत नाही कारण तिला कुटुंबाची काळजी असते. गेली तर ती घरच्या काळजीने उपचार अर्धवट सोडून परत येते. त्यामुळे बालक उपचारा विना राहते पण याचे खापर यंत्रणा बालकाच्या मातेवर फोडते पण बालकाच्या मातेची मानिसकता समजून घेत नाही.
कोणत्याच अंगणवाडीमध्ये विद्युतपुरवठा नाही
तालुक्यातील कोणत्याच अंगणवाड्यात विद्युत पुरवठा नाही. त्यामुळे कोंदट वातावरणात बालक, मातांना आहार घ्यावा लागतो. उन्हाळ्यात तर उष्णतेने बालकाची लाहीलाही होते पण वातानुकूलित कार्यालयात बसून निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांना याची जाणीव कशी होणार? बालके कुपोषित राहू नये यासाठी अमृत आहार योजना आहे पण तिचा निधीच वेळेवर येत नसल्याने अमृत आहार योजने पासून बालके वंचित राहतात तलासरी तालुक्यात जून जुलै पासून या योजनेचा निधी आलाच नाही.

Web Title: Death of 16 children in malnourished in five months in Dacca