७ सप्टेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्याची मुदत

By Admin | Updated: August 12, 2015 03:31 IST2015-08-12T03:31:07+5:302015-08-12T03:31:07+5:30

मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) विविध उत्पन्न गटांसाठी बांधलेल्या सदनिकांची लॉटरी मे महिन्यात काढण्यात आली. या सोडतीमधील विजेत्यांना ७ सप्टेंबरपर्यंत अ‍ॅक्सिस बँकेत

The deadline to submit documents by September 7 | ७ सप्टेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्याची मुदत

७ सप्टेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्याची मुदत

मुंबई : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) विविध उत्पन्न गटांसाठी बांधलेल्या सदनिकांची लॉटरी मे महिन्यात काढण्यात आली. या सोडतीमधील विजेत्यांना ७ सप्टेंबरपर्यंत अ‍ॅक्सिस बँकेत कागदपत्रे सादर करता येणार आहेत.
म्हाडाच्या १ हजार ६३ घरांची लॉटरी ३१ मे रोजी काढण्यात आली. या लॉटरीतील विविध भागांतील घरांसाठी सुमारे सव्वा लाख मुंबईकरांनी नशीब अजमावले होते. लॉटरीतील विजेत्यांना ७ सप्टेंबरपर्यंत अ‍ॅक्सिस बँकेच्या १५ शाखांमध्ये कागदपत्रे जमा करता येणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील १0 आणि राज्यातील इतर शाखांमध्ये विजेत्यांना कागदपत्रे जमा करता येतील. कागदपत्रे सादर करण्यात येणाऱ्या बँकांची यादी विजेत्यांना पाठविण्यात आलेल्या सूचनापत्रासोबत देण्यात आल्याचे, म्हाडाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: The deadline to submit documents by September 7