कचरापेटीत सापडले मृत नवजात अर्भक
By Admin | Updated: January 17, 2017 06:19 IST2017-01-17T06:19:45+5:302017-01-17T06:19:45+5:30
गेल्या काही दिवसांत शहरात नवजात अर्भक सापडण्याचे प्रमाण वाढले आहे.

कचरापेटीत सापडले मृत नवजात अर्भक
मुंबई : गेल्या काही दिवसांत शहरात नवजात अर्भक सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. बोरीवलीतही असाच एक प्रकार उघडकीस आला, ज्यात एका रुग्णालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या कचरापेटीत दोन दिवसांचे मृत अर्भक सापडले.
बोरीवली पोलिसांनी या बाळाला ताब्यात घेत शताब्दी रुग्णालयात पाठविले. तेथे डॉक्टरने त्याला मृत घोषित केले. हे बाळ अवघे दोन दिवसांचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यानुसार, त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी अनोळखी पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळाच्या पालकांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. गेल्या काही दिवसांत साकीनाका, जुहूमध्ये नवजात अर्भक सापडले होते. (प्रतिनिधी)