रोज ‘मरे’ त्याला...
By Admin | Updated: April 24, 2015 01:14 IST2015-04-24T01:14:10+5:302015-04-24T01:14:10+5:30
ओव्हरहेड वायरच्या तांत्रिक समस्येसह पॉवर डाऊनच्या समस्येने मध्य रेल्वेची वाहतूक गुरुवारी कोलमडल्याने रेल्वे प्रवाशांना त्याचा फटका बसला

रोज ‘मरे’ त्याला...
डोंबिवली : ओव्हरहेड वायरच्या तांत्रिक समस्येसह पॉवर डाऊनच्या समस्येने मध्य रेल्वेची वाहतूक गुरुवारी कोलमडल्याने रेल्वे प्रवाशांना त्याचा फटका बसला. ठाणे-मुलुंड मार्गावरील अप दिशेला कोपरी पुलाजवळ ओव्हरहेड वायरची समस्या आणि मुंब्रा-ठाणे मार्गावर पॉवर डाऊन झाल्याने अप मार्गावर या समस्या उद्भवल्या.
ओएचईची समस्या सकाळी १०.१५ ते ११ दरम्यान तर त्याच कालावधीत मुंब्रा येथे पॉवर डाऊनची समस्या उद्भवल्याची माहिती सुरक्षा विभागाने दिली. मुंबईकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावर सकाळच्या वेळेत ओएचईची (ओव्हर हेड इक्विपमेंट्स) समस्या उद्भवल्याने मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या ठाण्याजवळ एकामागोमाग एक अडकून पडल्या. त्यामुळे ठिकठिकाणी प्रवाशांची गैरसोय झाली. ठाणे स्थानकातून सुटणाऱ्या लोकल गाड्या काही कालावधीनंतर अप जलदमार्गे वळविल्या.
या घटनेमुळे डाऊनमार्गे डोंबिवली-कल्याणकडे येणाऱ्या गाड्याही खोळंबल्या होत्या, अशी माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली. डाऊन मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही या बिघाडामुळे फटका बसला.