समुद्रात सापडला महिलेचा मृतदेह

By Admin | Updated: November 4, 2016 05:37 IST2016-11-04T05:37:17+5:302016-11-04T05:37:17+5:30

समुद्रात दोन ते तीन किलोमीटर अंतरावर बुधवारी रात्री नौदलाच्या गस्ती नौकेला एका तरुणीचा चादरीत गुंडाळलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली

Dead body of woman found in the sea | समुद्रात सापडला महिलेचा मृतदेह

समुद्रात सापडला महिलेचा मृतदेह


मुंबई : नौदलाच्या आयएनएचएस हॉस्पिटलपासून समुद्रात दोन ते तीन किलोमीटर अंतरावर बुधवारी रात्री नौदलाच्या गस्ती नौकेला एका तरुणीचा चादरीत गुंडाळलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणीची अद्याप ओळख पटली नसून कफ परेड पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
नौदलाच्या गस्ती नौकेकडून कुलाबा परिसरातील समुद्रात गस्त सुरू असताना चादरीत गुंडाळलेला मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे बोटीवरील अधिकाऱ्यांना दिसले. त्यांनी याची माहिती यलोगेट पोलिसांना दिली. यलोगेट आणि कफपरेड पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविला. या तरुणीची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालात स्पष्ट झाले. याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात हत्या व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तरुणीची ओळख पटविण्यासोबत आरोपीचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Dead body of woman found in the sea