वाशिम जिल्ह्यात आढळली मृत बिबटया मादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2016 14:35 IST2016-08-25T14:35:40+5:302016-08-25T14:35:40+5:30

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव वनपरिक्षेत्रातील कोळगाव विभागात गुरूवार, २५ आॅगस्ट रोजी सकाळी ३.५ ते ४ वर्षे वयाची मादी बिबट मृतावस्थेथ आढळून आले

Dead bishops found in Washim district | वाशिम जिल्ह्यात आढळली मृत बिबटया मादी

वाशिम जिल्ह्यात आढळली मृत बिबटया मादी

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २५ : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव वनपरिक्षेत्रातील कोळगाव विभागात गुरूवार, २५ आॅगस्ट रोजी सकाळी ३.५ ते ४ वर्षे वयाची मादी बिबट मृतावस्थेथ आढळून आले. दोन-तीन दिवसांपूर्वीच ती मृत पावल्याची प्राथमिक माहिती असून, तीचे शव गुरूवारीच दुपारी अकोल्यातील स्नातकोत्तर पशुवैद्यकीय संस्थेत शवविच्छेदनाकरीता आणण्यात आले आहे.

गेल्या महिन्यात वाशिम जिल्ह्यातच आढळून आलेल्या आजारी बिबटचा मृत्यू झाला होता. तर एक विहिरीत पडलेल्या बिबटास वनविभागाच्या चमूने जीवदान दिले होते. गुरूवारी आढळून आलेल्या मादी बिबट कसे मृत पावले हे शवविच्छेदनानंतरच सिद्ध होईल. सायंकाळपर्यंत शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होण्याची शक्यता असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकऱ्यांनी लोकमतला दिली.

Web Title: Dead bishops found in Washim district