डीसीपीचा जबाब नोंद

By Admin | Updated: June 30, 2015 03:09 IST2015-06-30T03:09:11+5:302015-06-30T03:09:11+5:30

बहुचर्चित ड्रगमाफिया बेबी पाटणकर प्रकरणात गुन्हे शाखेने उपायुक्त नामदेव चव्हाण यांचा जबाब नोंदविला. उपायुक्त व पोलीस दलाचे प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी या वृत्तास दुजोरा दिला.

DCP statement statement | डीसीपीचा जबाब नोंद

डीसीपीचा जबाब नोंद

मुंबई : बहुचर्चित ड्रगमाफिया बेबी पाटणकर प्रकरणात गुन्हे शाखेने उपायुक्त नामदेव चव्हाण यांचा जबाब नोंदविला. उपायुक्त व पोलीस दलाचे प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी या वृत्तास दुजोरा दिला. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी चव्हाण यांचा तपशीलवार जबाब नोंदविण्यात आला. जबाबात संपूर्ण पाटणकर प्रकरणात अमली पदार्थविरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक व या गुन्ह्यातील आरोपी सुहास गोखले यांनी पुरवलेल्या माहितीबाबत चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण तपशील दिल्याचे समजते. गोखले यांनी न्यायालयात केलेल्या दाव्यानुसार काळोखेच्या सातारा येथील घरी ११० किलो एमडी असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. ती त्यांनी वरिष्ठांना दिली. तसेच फरार असलेल्या पाटणकरचीही माहिती वरिष्ठांना कळवली होती. मात्र वरिष्ठांनी हा दावा धुडकावला. तसेच गोखले यांनीच काळोखे व पाटणकर यांची अटक टाळण्यासाठी धडपड केली, असा आरोप ठेवला. (प्रतिनिधी)


काळोखेचीही चौकशी
नव्या तपशिलांची शहानिशा करण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक कोल्हापूर कारागृहात असलेल्या काळोखेची पुन्हा एकदा चौकशी करणार आहे. त्यासाठी एक पथक कोल्हापूरला रवाना झाल्याची माहिती मिळते.

Web Title: DCP statement statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.