डीसीसी बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी आडसकर यांची आत्महत्या, आधी विषारी औषध आणि नंतर घेतले पेटवून !
By Admin | Updated: July 21, 2016 19:57 IST2016-07-21T14:00:09+5:302016-07-21T19:57:30+5:30
डीसीसी घोटाळा प्रकरणातील आरोपी मेघराज आडसकर आत्महत्या प्रकरणात आता आणखी नवाच खुलासा समोर आला असून पेटवून घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी विषारी औषधही प्राशन केल्याची माहिती समोर आली आहे.

डीसीसी बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी आडसकर यांची आत्महत्या, आधी विषारी औषध आणि नंतर घेतले पेटवून !
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. २१ - डीसीसी घोटाळा प्रकरणातील आरोपी मेघराज आडसकर आत्महत्या प्रकरणात आता आणखी नवाच खुलासा समोर आला असून पेटवून घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी विषारी औषधही प्राशन केल्याची माहिती समोर आली आहे. विषारी औषध प्राशन केल्यानंतर त्यांनी पुन्हा अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याने या आत्महत्येचे गुढ वाढू लागले आहे. पोलीसही या घटनेमुळे चक्रावून गेले आहेत.
मेघराज यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर ही माहिती समोर आली असून त्यांच्या घरी ज्या ठिकाणी त्यांनी आत्महत्या केल्या त्या बेडरूममध्ये विषारी औषधाची एक रिकामी बाटलीही पोलीसांच्या हाती लागली आहे. हा सगळा प्रकार नेमका काय आहे, याचा तपास आता पोलीस करू लागले आहेत.
मेघराज यांचा अंबाजोगाई येथील हौसिंग सोसायटी भागात बंगला आहे. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांचे संपूर्ण कुटुंब लातूरला राहत असल्याने ते अधून मधून येथे एकटेच राहण्यासाठी येत असत. बुधवारी ते मुक्कामासाठी अंबाजोगाईत आले होते. मध्यरात्री त्यांनी स्वत:च्या बेडरूममध्येच पेटवून घेऊन आत्महत्या केली. घरात कोणीच नसल्याने हा प्रकार गुरूवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आला. सकाळपासूनच त्यांना कार्यकर्ते भेटण्यासाठी बंगल्यावर येत होते.
परंतु दरवाजा बंद असल्याने अजून ते उठले नसतील म्हणून कोणीही दरवाजा उघडण्याचा प्रयत्नही केला नाही. परंतु दुपार होत आली तरी दरवाजा बंद असल्याने कार्यकर्त्यांना संशय आला आणि त्यांनी दरवाजा तोडल्यानंतर बेडरूममध्ये त्यांचा जळालेल्या अवस्थेतेतील मृतदेह दिसला.
दरम्यान ही घटना पोलीसांना कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी काही वेळापूर्वीच पोहोचले असून आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलीसांना सापडली आहे. ही घटना शहर आणि जिल्ह्यात वाºयासारखी पसरली असून त्यांच्या बंगल्यासमोर लोकांची गर्दी झाली आहे.