जयंती दिन मतदार दिन का?
By Admin | Updated: May 22, 2017 00:33 IST2017-05-22T00:33:16+5:302017-05-22T00:33:16+5:30
दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या दिवशी १ जुलैला राज्यात कृषिदिन साजरा केला जात आहे. मात्र युती सरकारने त्यांचे महत्व कमी करण्यासाठी

जयंती दिन मतदार दिन का?
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या दिवशी १ जुलैला राज्यात कृषिदिन साजरा केला जात आहे. मात्र युती सरकारने त्यांचे महत्व कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक याच दिवशी मतदार जागृती दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, असा आरोप विधान परिषदेत विरोधकांनी केला.
सरकारचा तसा काहीही हेतू नसल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र, सदस्यांच्या भावना लक्षात घेवून १ जुलैला कृषिदिनच साजरा करावा आणि मतदार जागृती दिनाचा निर्णय निवडणूक आयोगाची चर्चा करुन घ्यावा, असे निर्देश सभापती रामराजे नाईक-निबांळकर यांनी दिले.