दिन है फ्रेंडशिप का..

By Admin | Updated: August 2, 2014 22:57 IST2014-08-02T22:57:52+5:302014-08-02T22:57:52+5:30

मैत्री हा शब्द आला की काहीसे असेच होऊन जाते. तिथे शब्द अपुरे पडतात. तिथे भावना थांबून जातात. तिथे काही लिहावेसे नाहीतर बोलावेसेही वाटत नाही.

Day is Friendship .. | दिन है फ्रेंडशिप का..

दिन है फ्रेंडशिप का..

मैत्री हा शब्द आला की काहीसे असेच होऊन जाते. तिथे शब्द अपुरे पडतात. तिथे भावना थांबून जातात. तिथे काही लिहावेसे नाहीतर बोलावेसेही वाटत नाही. सारे काही मनामनाला कळून जाते. फ्रेंडशिप डे रविवारी साजरा होत आहे. शाळा, कॉलेजचे विद्यार्थी तो शनिवारी आणि सोमवारी साजरा करतील त्यांची मैत्री नुकतीच निर्माण झालेली. नुकतीच उमलायला लागलेली. मदतीसाठी हात पुढे केल्यावर धावून येते ती मैत्री एवढेच म्हणण्याएवढी साधी.. सोपी
 
मैत्री, दोस्ती, फ्रेंड, यारी विविध भाषांमध्ये शब्द वेगवेगळे असले तरी अर्थ एकच. मैत्री हे नाते  इतर नात्यांपेक्षा नक्कीच भक्कम असते. अहो संकटसमयी धावण्याबरोबर वेळप्रसंगी मित्रसाठी जीव द्यायला मागेपुढे पाहत नाहीत, असे हे नाते असते.
 
शाळा, कॉलेजमध्ये तर ‘फ्रेंडशिप डे’ची मुलांना क्रेझ असते. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी हा डे सेलीब्रेट होत असल्याने, बरेच जण  रविवारी सुट्टी असल्याने शनिवारीच सेलीब्रेट करतात. विविध प्रकारचे बँड, गिफ्ट, टी-शर्ट खासकरून मित्रसाठी घेतले जातात. पेनाने एकमेकांच्या हातावर, टी-शर्टवर नावे लिहिली जातात.
 
मैत्रीला वयाची अट नसते. फक्त त्यातील विश्वास महत्त्वाचा असतो. आपले आई-वडीलही आपले चांगले मित्रच असतात. कारण जो आपल्याला समजून घेतो, आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवतो, चांगले-वाईट सांगतो तो आपला चांगला मित्र असतो. फक्त तुमचा त्याबद्दलचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. 
 
आता मुंबईच्या लाइफबद्दल बोलायचे झाले. तर घडय़ाळाच्या काटय़ावर सगळेच जण धावत असतात. शाळा, कॉलेज संपल्यावर प्रत्येक जण आपापल्या करिअरच्या दिशेने धावत असतो. सकाळची ठरावीक गाडी पकडून ऑफिसला जायचे आणि रात्री गाडी पकडून घरी यायचे एवढेच काय ते आपले आयुष्य उरते.
 
त्यामुळे असे ‘डे’ आले की आपल्या जुन्या आठवणी ताज्या होतात. तो कॉलेजचा कट्टा आठवू लागतो आणि आपोआप ‘क्या वो दिन थे’ अशी वाक्ये बाहेर निघतात. पण या धावपळीच्या आयुष्यातही तुम्ही मैत्रीचा अनुभव घेऊ शकता. विविध विषयांवरील टाइमपास गप्पांबरोबर विविध सणांचे सेलीब्रेशन ट्रेनमध्ये केले जाते. 
 
एकमेकांच्या अडचणी समजून मार्ग काढण्याचा प्रय}ही होतो. म्हणजे थोडक्यात दिवसभराचा थकवा, कामाचे टेन्शन विसरण्याचे लोकल हे एक ठिकाण झाले आहे. म्हणजे शाळा, महाविद्यालय झाल्यानंतर मैत्री संपली असे मानण्याला काही अर्थ नाही. मैत्री कुठेही आणि कधीही होऊ शकते.. फक्त ती निखळ हवी.
 
बच्चेकंपनीलाही लागले वेध
ऑगस्ट महिना सुरू झाला तरुणाईपासून अगदी बच्चेकंपनीर्पयत सर्वानाच वेध लागतात ते फ्रेंडशिप डेचे. काही वर्षापूर्वी केवळ महाविद्यालयांत साजरा होणारा हा दिवस आता शाळांमध्ये नव्हे तर नर्सरी, ज्युनिअर्स-सिनिअर्सचे विद्यार्थीही उत्साहात साजरा करताना दिसतात, त्यासाठी वेगवेगळे प्लॅनिंग करताना दिसत आहेत. 
इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळांमध्ये या दिवसानिमित्त खास अॅक्टिव्हिटी घेतल्या  जातात. फ्रेंडशिप बॅण्ड मेकिंग, फ्रेंडशिप कार्ड  तयार करणो, मैत्रीवर निबंध लिहिणो, मैत्रीवर पत्र लिहिणो यांसारख्या स्पर्धा यावेळी घेण्यात येत असून उत्कृष्ट सादरीकरणाला पारितोषिकही देण्यात येते. फ्रेंडशिप डे रविवारी येत असल्याने शाळांना सुटी असते त्यामुळे एक दिवस आणि किंवा नंतर शाळांमध्ये हा दिवस जल्लोषात सजरा होतो. 
मुंबई, नवी मुंबई परिसरातील बहुतांश शाळांमध्ये सोमवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी लहानग्यांची जय्यत तयारी सुरू आहे. वेगवेगळ्या रंगांच्या रिबिन्स, बॅण्डबरोबरच डोरेमॉन, बेनटेन, छोटा भीम, बालवीर आदी  अॅनिमेटेड अंगठय़ा खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये तरुणांबरोबरच बच्चेकंपनीचीही गर्दी दिसत आहे. 
पॉकेटमनीतील पन्नास, शंभर रुपये घेऊन दुकानात आपल्या बजेटप्रमाणो खरेदी करताना त्यांच्या चेह:यावरचा आनंद पाहण्यासारखा आहे. फ्रेंडशिप कार्डसाठी पैसे कमी पडले की त्यांचा मोर्चा फ्रेंडशिप बॅण्ड-अंगठय़ांकडे वळत आहे. मात्र अंगठय़ाही सर्व मित्र-मैत्रिणींना घेता येत नसल्याचे लक्षात आल्यावर कलरफूल  रिबिन्स खरेदी करून फेंडशिपचे प्लॅनिंग होत आहे. शाळेबरोबरच विविध सोसायटय़ा  गृहसंकुलांतही मुलांकडून बच्चेकंपनीचे  फ्रेंडशिप डेसाठी  खास प्लॅनिंग सुरू आहे. काहींचा भर चायनिजवर आहे. तर काहींनी डब्बा पार्टी, होममेड मेन्यू ठरवले आहेत. टिनेजर्सनेही फ्रेंडशिप डेच्या नावे भर पावसात फुटबॉल, क्रिकेट मॅचचे प्लॅनिंग केले आहे. भरीस भर म्हणून संध्याकाळी यो यो हनी सिंगच्या गाण्यांवर थिरकण्याचीही सोय केली आहे. त्यामुळे एकेकाळी तरुणाईची मक्तेदारी असलेला फ्रेंडशिप डे आता चिमुकल्यांचा पार्टी डे बनला आहे. 
 
मेसेजिंग मैत्री
मोबाइल आणि सोशल नेटवर्किग साइटवर फ्रेंडशिपचे मेसेज शेअरिंग लाखोंच्या संख्येने होत आहे. यात जुन्या मित्रंची आठवण करून देणारे 
‘रोजच आठवण व्हावी, असे काही नाही, 
रोजच बोलणो व्हावे, असेही काही नाही,
मात्र कधीतरी विचारपूस व्हावी, याला खात्री म्हणतात,
आणि या खात्रीची जाणीव असणो, याला मैत्री म्हणतात’
असे एमएमएस मनात घर करून जातात तर  कामाच्या व्यापात आलेला 
‘तू हॅपी.. तर मी हॅपी
तू सॅड..तर मी सॅड
तू हसणार.. तर मी हसणार
तू रडणार.. तर मी रडणार
तू चिखलात पडणार.. मी फोटो काढणार आणि फेसबुकवर शेअर करणार’
सारखा मेसेज चेह:यावर निखळ हसू फुलवतो आणि असे खोडकर मित्रही हवेहवेसे वाटतात. तर कधी विश्वासाने आलेला
‘प्रत्येक वळणावर आठवण येत राहील, 
एकत्र नसलो तरी सुगंध दरवळत राहील,
कितीही दूर गेलो तरी, मैत्रीचे हे नाते,
आज आहे तसेच उद्याही राहील।।
मेसेज जगण्याचे नवे बळ देतो आणि सुखदु:खात साथ देणारी कुणीतरी हक्काची व्यक्ती आपल्या जवळ असल्याचे समाधान देऊन जातो. 
 
मैत्री हा शब्द आला की काहीसे असेच होऊन जाते. तिथे शब्द अपुरे पडतात. तिथे भावना थांबून जातात. तिथे काही लिहावेसे नाहीतर बोलावेसेही वाटत नाही. सारे काही मनामनाला कळून जाते. 
फ्रेंडशिप डे उद्या रविवारी साजरा होत आहे. शाळा, कॉलेजचे विद्यार्थी तो शनिवारी आणि सोमवारी साजरा करतील त्यांची मैत्री नुकतीच निर्माण झालेली. नुकतीच उमलायला लागलेली. मदतीसाठी हात पुढे केल्यावर धावून येते ती मैत्री एवढेच म्हणण्याएवढी साधी.. सोपी, पण कॉलेज उलटून अनेक वर्षे गेली आणि फ्रेंडशिप बेल्ट बांधायचे दिवस संपलेल्यांनाही काहीसे लिहावेसे वाटले ते या फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने. फेसबुकमित्र फोटोंना नाही तर शेअर केलेल्या व्हिडीओजना हवी तशी कमेंट देतात, मात्र एखादा चर्चेचा विषय झाला तर मात्र सगळ्यांचीच बोलती बंद होते. मात्र फेसबुकमित्रंनी यावरही बोलती चूपच केली.  
सहज सुचले. आपण नेहमीच फेसबुकला भेट देतो, मित्र-मैत्रिणी पाहू तरी काय कमेंट देतात याच्याकडे. रमेश म्हणाला, प्रेम, राग, रूसवे, आधार आणि जिथे आपण भांडणाचीही ताकद ठेवू शकतो तिथेच मैत्री आणि मित्रत्व आहे. पद्मा म्हणाल्या, अंधारात दूर जात नाही ती मैत्री, संकटात साथ सोडत नाही ती मैत्री, श्रीमंतीचा माज आणत नाही ती मैत्री आणि गरिबीचे दु:ख करीत नाही ती मैत्री.. अशा वेगळ्याच रूपातून मैत्री व्यक्त झाली. 
बाबा देशमाने म्हणाले की, मैत्री शब्दाचा अर्थ एका वाक्यात नाही सांगता येत. त्या एका शब्दावरच सारी इमारत उभी असते. आनंदाच्या प्रत्येक क्षणात आपल्याला सोबत करते ती मैत्रीच तर असते. नाना म्हणतात, मैत्री म्हणजे मैत्रीच तर असते. तिची व्याख्या आणखी काय बरं करणार? 
वसंत म्हणतो सगळ्या क्षणी ज्यांची आठवण होते ते मित्र होय. लहानपणापासून ज्यांनी साथसंगत केली, त्या मित्रंची आठवण प्रत्येक क्षणी होतेच.
 
रीना म्हणते, मैत्री म्हणजे लिंबाचे लोणचे
जितके जुने तितकेच मुरलेले
थोडेसे आंबट.. थोडेसे गोड.. ट्रेनमधल्या मैत्रिणीही कधी कधी दिवसभरातील थकवा असे विनोद करून दूर करतात आणि नवा आनंद सामावून जातो.
 
एक्साइटमेंट ऑन
1हे प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येत आहे की तुम्ही जगातील सर्वात चांगले मित्र, मैत्रीण आहात अशा आशयाचे संदेश असणारी प्रशस्तिपत्रकाच्या आकारातील शुभेच्छापत्रे, चॉकलेटचा बुके, मैत्रीचा संदेश देणारे मग अशा खिशाला परवडणा:या तसेच महागडय़ा वस्तू बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. आणि अर्थात या दिवशी या वस्तूंना चांगलीच मागणी असल्याने या वस्तूंनीही चांगलाच भाव खाल्ला आहे.
 
2मैत्री म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुखाचा धागा आहे. त्या मैत्रीचे प्रतीक म्हणून ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार म्हणजेच फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. तरुण-तरुणी एकमेकांच्या हातात फ्रेंडशिप बँड बांधतात. नवीन मित्र बनवतात. बाजारपेठाही या रंगीबेरंगी फ्रेंडशिप बँड्स आणि भेटवस्तूंनी सजल्या आहेत. रविवारी फ्रेंडशिप डे असला तरी शनिवारी सायंकाळ आणि सोमवार सकाळर्पयत ही खरेदी सुरूच असते.
 
3सध्या मुलींसाठी ब्रेसलेट, पर्स, बांगडय़ा, बँड, टेडिबेअर, ग्रीटिंग्स आाणि मुलांसाठी  ब्रेसलेट्स आहेत. फ्रेंड्स या शब्दाच्या आकाराचे चॉकलेट बाजारात उपलब्ध आहे. मात्र  ग्रीटिंग्सची मागणीही चांगलीच आहे. स्वत:च्या हातून बनवलेल्या ग्रीटिंग्सची मजाच काही और असल्याचे तरुणांचे म्हणणो आहे. याशिवाय बेस्टफ्रेंड फॉर एव्हर अशा आशयाचे टी-शर्टस, फोटो अल्बम, फुगे, किचेन्सचीही मागणी आहे. 
 
आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे! 
वासुदेव म्हणतात, मैत्रीचे ते पुस्तक, चित्रपटातले डायलॉग्ज काहीच कामाचे नाहीत. मित्र आणि बॉयफ्रेंडची, गर्लफ्रेंडशी सीमाच पुसली जात आहे. काही ठिकाणी तर अफेअर लपविण्यासाठी जी नाती निर्माण केली जातात ती फ्रेंड अर्थात मित्रत्वाच्या फ्रेममध्ये जबरदस्तीने बसविली जातात, असा थोडासा विनोदी लूकही त्यांनी मैत्रीला दिला.  
 
नवीन कॉलेजिअन्सचा फस्र्ट डे
नव्याने कॉलेजमध्ये प्रवेश केलेल्या कॉलेजिअसन्सचा कॉलेजमधला फस्र्ट डे असल्याने हे विद्यार्थी चांगलेच एक्साइटेड आहेत. अर्थात नवीन मित्र मिळणार, काहींशी यानिमित्ताने जाऊन ओळख करायला मिळणार त्यामुळे त्यांची काहीशी विशेष तयारी झाली आहे. रिबिन्समध्येही प्रत्येक कलरचा वेगळा अर्थ या मुलांनी केला आहे. रेड म्हटला की बेस्ट फ्रेंड, पिवळा म्हणला की न्यू फ्रेंड अशा प्रत्येक रंगांच्या फ्रेंडशिप बँडचे एक वेगळे वैशिष्टय़ आहे.
 

 

Web Title: Day is Friendship ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.