दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला मुंबईत अटक
By Admin | Updated: February 3, 2015 18:51 IST2015-02-03T18:51:22+5:302015-02-03T18:51:42+5:30
एका इस्टेट एजंटकडून खंडणी मागणे व त्याला मारहाण केल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याला मंगळवारी संध्याकाळी मुंबई पोलिसांनी अटक केली.

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला मुंबईत अटक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - एका इस्टेट एजंटकडून खंडणी मागणे व त्याला मारहाण केल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याला मंगळवारी संध्याकाळी मुंबई पोलिसांनी अटक केली. इक्बालसह त्याच्या एका साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.
सलीम शेख या इस्टेट एजंटने सोमवारी रात्री इक्बाल कासकर व त्याच्या दोघा साथीदारांविरोधात भायखळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आठवडाभरापूर्वी कासकर व त्याच्या साथीदारांनी मारहाण करत तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे शेख यांनी तक्रारीत म्हटले होते. मंगळवारी संध्याकाळी मुंबई पोलिसांनी इक्बाल कासकरला जेरबंद केले. इक्बाल हा सारा सहारा प्रकरणातील आरोपी असून २००३ मध्ये त्याला दुबईतून भारतात पाठवण्यात आले होते. यानंतर त्याला मोक्का कायद्याखाली अटकही झाली होती. सध्या इक्बाल हा मुंबईतील बांधकाम क्षेत्रात कार्यरत असल्याचे समजते.