दाऊदची बहिण हसीना पारकरचा मृत्यू
By Admin | Updated: July 6, 2014 17:12 IST2014-07-06T17:10:14+5:302014-07-06T17:12:30+5:30
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमची बहिण हसीना पारकरचा रविवारी ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला.

दाऊदची बहिण हसीना पारकरचा मृत्यू
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २०- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमची बहिण हसीना पारकरचा रविवारी ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. हसीना ही दाऊदची सर्वात जवळची बहिण म्हणून ओळखली जात असून दाऊदप्रमाणेच हसीनावरही फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल होते.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची बहिण हसीना मुंबईतील डोंगरी भागात राहत होते. रविवारी डोंगरीतील हबीब रुग्णालयात हसीनाचा ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिस सतर्क झाले असून हसीना यांच्या अंत्यसंस्कारावर पोलिसांची नजर असणार आहे. हसीना यांच्यावर खंडणी, धमकावणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. तसेच दाऊदच्या पलायनानंतर मुंबईतील त्याचा व्यवसाय हसीनाने सांभाळला होता असे सांगितले जाते.