डेव्हिड हेडलीची २२ मार्चपासून होणार उलट तपासणी
By Admin | Updated: March 10, 2016 14:36 IST2016-03-10T13:35:15+5:302016-03-10T14:36:03+5:30
मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हिड कोलमन हेडलीची 4 दिवस उलट तपासणी होणार आहे,22 मार्च ते 25 मार्चपर्यंत ही उलट तपासणी होणार आहे

डेव्हिड हेडलीची २२ मार्चपासून होणार उलट तपासणी
>
ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १० - 26/11 दहशतवादी हल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हिड कोलमन हेडलीची 4 दिवस उलट तपासणी होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरुन ही उलट तपासणी होणार आहे. बचावपक्षाचे वकील अब्दुल वाहब खान ही उलट तपासणी करणार आहेत. 22 मार्च ते 25 मार्चपर्यंत ही उलट तपासणी होणार आहे.
दहशतवादी हल्याचा प्रमुख आरोपी अबु जुंदालचे वकील अब्दुल वाहब खान यांनी न्यायालयाकडे डेव्हिड हेडलीची उलट तपासणी करण्यासाठी चार दिवस मागितले होते. न्यायाधीश जी ए सानप यांनी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांना अमेरिकन अधिका-यांशी संपर्क साधून डेव्हिड हेडलीला पुन्हा कधी बोलावू शकतो याची माहिती घेण्यास सांगितले होते. डेव्हीड हेडलीच्या उपलब्धतेची माहिती मिळाल्यानंतर न्यायालय पुढील तारखा ठरवणार होते.