गर्भवती महिलेवर दरोडेखोरांचा बलात्कार
By Admin | Updated: December 30, 2015 00:45 IST2015-12-30T00:45:58+5:302015-12-30T00:45:58+5:30
पाथरी-सेलू रस्त्यावरील बांदरवाडा शिवारात दरोडेखोरांनी तिघांवर शस्त्राने वार करीत तीन दरोडेखोरांनी गर्भवती महिलेवर बलात्कार केल्याची संतापनजनक घटना घडली.

गर्भवती महिलेवर दरोडेखोरांचा बलात्कार
पाथरी (जि. परभणी) : पाथरी-सेलू रस्त्यावरील बांदरवाडा शिवारात दरोडेखोरांनी तिघांवर शस्त्राने वार करीत तीन दरोडेखोरांनी गर्भवती महिलेवर बलात्कार केल्याची संतापनजनक घटना घडली.
पोलिसांनी अवघ्या पाच तासांत सुनिल शेषराव शिंदे (२२), अनिल उत्तम पवार (१८) व रवि भास्कर पवार (२१, सर्व रा़ सागर कॉलनी, पाथरी) यांना अटक केली. संध्याकाळपर्यंत आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले.
पाथरी शहरापासून सेलू रस्त्यावर ३ कि़मी़ अंतरावर बांदरवाडा शिवारात आखाड्यावर काही कुटुंब राहतात़ सोमवारी रात्री एका आराखड्यावर दरोडेखोरांनी दगडफेक केली़ प्रतिउत्तरात शेतकऱ्यांनीही जोरदार दगडफेक केल्याने दरोडेखोरांनी तेथून काढता पाय घेतला़ त्यानंतर दरोडेखोर अशोक व दामू पितळे यांच्या आखाड्यावर गेले़ तेथे झोपलेल्या सालगड्यास मारहाण करून त्याच्याकडून ५ हजार रुपये व दागिने काढून घेतले़ त्यानंतर दरोडेखोर हम्मु चाऊस यांच्या आखाड्यावर गेले़ येथे रणजीत सखा गायकवाड, शेख अनिस शेख बाबा व सय्यद शहाबुद्दीन स़ बशीर यांच्या कुटुंबातील काही जणांना दरोडेखोरांनी कुऱ्हाड, सत्तूर व लोखंडी पाईपने जबर मारहाण केली़ त्यात अशोक व दामोधर पितळे आणि रणजीत गायकवाड गंभीर जखमी झाले़ त्यांच्यावर परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरोडेखोरांनी बाजूच्या खोलीमध्ये झोपलेल्या पाच महिन्याच्या गर्भवती महिलेला दूरवर नेऊन तिघांनी बलात्कार केला़
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मध्यरात्री पोलीस घटनास्थळी दाखल झाले़ शोध पथकाने तातडीने कारवाई करत अवघ्या पाच तासांत तिघांना अटक केली, अशी माहिती पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी दिली. (प्रतिनिधी)
२३ हजारांची लूट
दरोडेखोरांनी तीन आखाड्यांवरील सालगड्यांकडून २२ हजार ८०० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व एक मोबाईल असा २३ हजार ६०० रुपयांचा ऐवज लुटला़ पोलिसांनी दरोडेखोरांकडून मोबाईल जप्त केला.