अत्याचारीत मुलीने दिला मुलीला जन्म

By Admin | Updated: September 5, 2016 02:45 IST2016-09-05T02:45:26+5:302016-09-05T02:45:26+5:30

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणीची फसवणूक करून गँगरेप झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

Daughter gave birth to daughter | अत्याचारीत मुलीने दिला मुलीला जन्म

अत्याचारीत मुलीने दिला मुलीला जन्म


नवी मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणीची फसवणूक करून गँगरेप झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीने नुकताच मुंबईच्या एका रुग्णालयात मुलीला जन्म दिला आहे. कुटुंबीयांच्या व समाजाच्या भीतीने घडलेल्या प्रसंगाची माहिती तिने लपवली होती. मात्र झालेल्या अत्याचारातून ती गरोदर राहिली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानुसार तब्बल एक वर्षाने गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चौघांपैकी तिघांना अटक केली आहे.
सुमारे एक वर्षापूर्वी मुंबईची राहणारी एक तरुणी नोकरीच्या शोधात रबाळे एमआयडीसी परिसरात आली होती. त्याठिकाणी तिला भेटलेल्या व्यक्तीने एक मोबाइल नंबर देवून नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तरुणीने दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता तिला एकाने मुंबईतील रेल्वेस्थानकात भेटायला बोलावले व पुन्हा रबाळे एमआयडीसीतील एका घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्या व्यक्तीने फोनवर धमकावून तिला भेटीसाठी बोलावले होते. यावेळी त्याठिकाणी उपस्थित चौघांनी तिच्यावर गँगरेप केला. परंतु धमकावल्यामुळे तसेच समाजाच्या व कुटुंबीयांच्या भीतीने पीडित तरुणीने अत्याचाराबाबत कुणालाही माहिती सांगितली नाही. काही महिन्यांनी गरोदर असल्याचेही तिच्या निदर्शनास आले. घरच्यांना याबाबत उशिराने समजले. दोन महिन्यांपूर्वी पीडित मुलीने मुंबईतील रुग्णालयात मुलीला जन्म दिला. यावेळी नवजात मुलीचा पिता कोण? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर रुग्णालयाकडून पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर तरुणीने घडलेल्या अत्याचाराची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली. हा तपास रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग झाल्यावर गँगरेपचा गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)
>तीन आरोपींना अटक
अत्याचारप्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्याचे उपनिरीक्षक प्रदीप सरफरे यांनी सांगितले. गुन्ह्यातील अद्याप एक जण फरार असून त्याचाही शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत काटकर यांनी सांगितले. तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिलेली आहे.

Web Title: Daughter gave birth to daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.