मुलीने केला दारुड्या पित्याचा खून

By Admin | Updated: July 19, 2016 14:10 IST2016-07-19T12:45:27+5:302016-07-19T14:10:26+5:30

दारूड्या पित्याच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून मुलीने पित्याचा खन केल्याची घटना वर्धा येथे घडली.

Daughter father's father murdered | मुलीने केला दारुड्या पित्याचा खून

मुलीने केला दारुड्या पित्याचा खून

ऑनलाइन लोकमत

वर्धा, दि. १९ -   कारंजा(घा.) येथे मुलीने नेहमीच्या त्रासाला कंटाळून दारुड्या पित्याचा खून केला. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. पोलिसांनी चौकशीअंती रात्री 1 वाजता मुलगी ज्योती रमेश गाडरे (22) हिला अटक केली. तिने खुनाची कबुली दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

रमेश गाडरे(48) हा नेहमीप्रमाणे मद्य प्राशन करून घरी आला. यानंतर त्याने घरी भांडण केले. त्याची ज्योतीसोबत झटापट झाली. यातच ज्योतीने चाकूने पित्यावर हल्ला चढविला. यात तो जागीच ठार झाला. वास्तविक, ही घटना कुणालाही कळली नव्हती. मुलगी व तिची आई दोघीही घराला कुंडी लावून शेजारच्या घरी गेल्या होत्या. काही वेळाने तिच्या आईने मुलाला आवाज देऊन घरातून काहीच आवाज येत नसल्याचे सांगून चौकशी करायला सांगितले. मुलाला घरात वडील रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसले. यानंतर घटना उघड झाली. याबाबत पोलिसही विचारात पडले. अधिक चौकशी केली असता पोलिसांचा मुलीवर संशय पक्का होताच तिला रात्री ताब्यात घेतले. अखेर तिने आपणच खून केल्याचे कबुल केल्याने तिला अटक केल्याचे कारंजा पोलिसांनी सांगितले.

Web Title: Daughter father's father murdered