पोटच्या मुलांना विष पाजून सांगलीत दाम्पत्याने केली आत्महत्या

By Admin | Updated: December 28, 2015 12:50 IST2015-12-28T12:48:13+5:302015-12-28T12:50:23+5:30

पोटच्या मुलांना विष पाजून पती-पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात घडली.

Daughter committed suicide by stabbing her children in Sangli | पोटच्या मुलांना विष पाजून सांगलीत दाम्पत्याने केली आत्महत्या

पोटच्या मुलांना विष पाजून सांगलीत दाम्पत्याने केली आत्महत्या

>ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. २८ - पोटच्या मुलांना विष पाजून नंतर पती-पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात घडल्याचे उघडकीस आले आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बनेवाडी येथे ही घटना घडली. संजय यादव (४५), जयश्री यादव (३०), राजवर्धन यादव (४) व समृद्धी यादव (६ महिने) अशी मृतांची नावे असून सावकाराच्या कर्जातून ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्लामपूरजवळील बनेवाडी येथे राहणा-या यादव पती-पत्नीने सोमवारी पहाटे आपल्या दोन्ही मुलांना विष पाडले. त्यांच्या मृत्यू झाल्यानंतर त्या दोघांनीही गळफास घेत आत्महत्या केली. शेजारच्यांना हा प्रकार समजताच त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून सांगली ग्रामीण पोलिस पुढील तपास करत आहेत. 
 

Web Title: Daughter committed suicide by stabbing her children in Sangli