शनिवारी जाहीर होणार दहावीच्या निकालाची तारीख
By Admin | Updated: June 4, 2015 11:04 IST2015-06-04T11:01:23+5:302015-06-04T11:04:30+5:30
दहावीच्या निकालाच्या तारखेबाबतीत सुरू असलेल्या अफवांना आता पूर्णविराम मिळणार असून येत्या शनिवारी म्हणजेच ६ जून रोजी अधिकृतरित्या निकालाची तारीख जाहीर होणार आहे

शनिवारी जाहीर होणार दहावीच्या निकालाची तारीख
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ४ - दहावीच्या निकालाच्या तारखेबाबतीत सुरू असलेल्या अफवांना आता पूर्णविराम मिळणार असून येत्या शनिवारी म्हणजेच ६ जून रोजी अधिकृतरित्या निकालाची तारीख जाहीर होणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाराम म्हम्हाणे यांनी हा खुलासा केला आहे.
व्हॉट्सअॅप व इतर सोशल मीडिया साईट्सवर गेल्या आठवड्यापासून दहावीच्या निकालाच्या तारखेबाबत वेगवेगळे मेसेज फिरत असल्याने गोंधळ निर्माण झाला होता.१२ वीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांनाच आता दहावीच्या निकालाबाबत उत्सुकता असून निकालाच्या तारखेची घोषणा कधी होते याकडे सर्वांचे लक्ष होते.
दरम्यान सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या तारखेवर पालक व विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी केले आहे.